Content Status
Type
Linked Node
Effects of Stigma on TB Patients
Learning ObjectivesEffects of Stigma on TB Patients
H5Content
Content
टीबी रुग्णांवर कलंकाचे परिणाम
वैयक्तिक पातळीवर
- आत्मसन्मान आणि आत्मविश्वासाचा अभाव
- भावनिक विलगीकरणाची भावना, अपराधीपणाची भावना आणि चिंता
- शारीरिक तसेच आर्थिक दुर्बलता
- लोक, बहुतेकदा महिलांना, त्यांची घरे सोडण्यास भाग पाडले जाते.
- लक्षणे लपविणे आणि वैद्यकीय सेवा मिळविण्यात संकोच करणे यामुळे रोगाचे उपचार व्यवस्थापन अधिक कठीण बनवते.
- विलंबित निदान,खंडीत उपचार ज्यामुळे पुढील संक्रमण आणि DRTB होऊ शकते
- असुरक्षितता वाढते, एकाकीपणा आणि लोकलाजेस्तव आत्महत्येचे विचार येऊ शकतात.
कौटुंबिक आणि समुदाय स्तरावर
- कौटुंबिक उत्पन्नामध्ये घट
- टीबी रुग्णाची काळजी घेणाऱ्यांना संसर्ग होण्याच्या जोखमीमुळे उत्पादकता कमी होते आणि गरिबीचे चक्र पुढे चालू होते.
- संक्रमित व्यक्तींना त्यांच्या समुदायातील लोकांकडून वाळित टाकणे आणि त्यांना कलंकित करणे.
- प्रभावित आणि संक्रमित लोकांच्या सांस्कृतिक आणि धार्मिक रिती रिवाज मधे ज्ञानाचा अभाव आणि खोलवर रुजलेले गैरसमज आहेत.
- समाजातील प्रतिष्ठा कमी होणे आणि रोगी व्यक्तींवर, त्यांची काळजी घेणाऱ्या लोकांवर, त्यांच्या कुटुंबावर, मित्र परिवारावर आणि समाजावर नकारात्मक परिणाम होणे.
- टीबी ही पापांची किंवा उल्लंघनाची शिक्षा आहे, आणि हा एक कलंक आहे ही भावना /गैरसमज सामाजिक-सांस्कृतिक मूल्यांमुळे समाजात खोलवर रुजलेला आहे
Content Creator
Reviewer
Target Audience
- Log in to post comments