Linked Node

Content

निदान आणि उपचार होईपर्यंत संशयित टीबी रुग्णाचा प्रवास (रुग्ण प्रवाह-Patient Flow)

ज्यांना क्षयरोगाचा संशय आहे, त्यांची लक्षणांसाठी प्रथम तपासणी केली जाते, जसे दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ खोकला आणि ताप, थुंकी मध्ये रक्त आणि वजन कमी होणे इ.  तपासणीत पॉझिटिव्ह आढळल्यास, टीबी रुग्णांना जवळच्या  आरोग्य संस्थेकडे (DMC/NAAT सुविधा) चाचणीसाठी पाठवले जाते. क्षयरोगाचे निदान झाल्यास, त्यांच्यावर उपचार सुरू केले जातात. कार्यक्षेत्रात काम करणारे आरोग्य कर्मचारी किंवा 99DOTS आणि MERM (मेडिकेशन इव्हेंट रिमाइंडर मॉनिटर) तंत्रज्ञान, यांसारख्या डिजिटल हस्तक्षेपांच्या मदतीने उपचार सुरू केलेल्या क्षयरुग्णांचे नियमितपणे निरीक्षण केले जाते. क्षयरुग्णांचा उपचार पूर्ण होईपर्यंत त्यांचा  नियमितपणे पाठपुरावा-Follow up (तपासणी आणि काळजी घेणे)  होतो की  नाही  याची आरोग्य  कर्मचारी  पुष्टी करतात.

Image
रुग्ण प्रवाह

 

आकृती: रुग्ण प्रवाह

Content Creator

Reviewer