Linked Node

Content

DRTB साठी स्क्रीनिंग

क्षयरोगाचे निदान झालेल्या सर्व रूग्णांची रिफॅम्पिसिन रेझिस्टन्ससाठी शक्य तितक्या लवकर UDST केली पाहिजे आणि पुढे ज्यांचे रिफॅम्पिसिन रेझिस्टन्स सकारात्मक येते त्यांची किमान फ्लोरोक्विनोलोन  (fluroquinolones) साठी UDST केली पाहिजे.  



UDST चाचण्या शक्यतो उपचार सुरू होण्यापूर्वी निदान झाल्यापासून जास्तीत जास्त १५ दिवसांच्या आत केली पाहिजे. UDST चाचणीच्या निकालावर आधारित,  जर  रिफॅम्पिसिन औषधांस प्रतिरोध आढळला, रुग्णाला DR-TB उपचार पद्धतीमध्ये हलवले जाते.जर रिफॅम्पिसिनचा प्रतिरोध आढळला नाही, तर प्रथम श्रेणी क्षयरोगविरोधी उपचार सुरू ठेवला जातो आणि रुग्णाची पुढील तपासणी केली जाते. कोणत्याही रुग्णाच्या पाठपुराव्यादरम्यान बेडका तपासणी  सकारात्मक आल्यास, बेडका पुढील औषध प्रतिरोध चाचणीसाठी पाठविला जातो आणि रुग्णाला फॉलोअपसाठी PHI कडे पाठवले जाते.

 

Image
आकृती: डीएसटीबी उपचारातून डीआरटीबी उपचार सुरू करण्यासाठी रुग्णाची तपासणी

आकृती: डीएसटीबी उपचारातून डीआरटीबी उपचार सुरू करण्यासाठी रुग्णाची तपासणी

 

Content Creator

Reviewer

Comments