Linked Node

Content

एनटीईपीची संघटनात्मक रचना



राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रम (NTEP) हा राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या अंतर्गत राबविण्यात येणारा केंद्र पुरस्कृत कार्यक्रम आहे.

 

राष्ट्रीय स्तर:  केंद्रीय क्षयरोग विभाग (CTD), आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाची तांत्रिक शाखा (MOHFW)  या  द्वारे कार्यक्रम  व्यवस्थापित आहे.

 

राज्य स्तर:  राज्य क्षयरोग कक्ष हा राज्य आरोग्य संस्थेच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील संपूर्ण क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमाचे समन्वय साधतो. राज्य स्तरावर प्रशिक्षण, पर्यवेक्षण, देखरेख ,मूल्यमापन & NTEP ची देखभाल STDC ( राज्य टीबी प्रशिक्षण आणि प्रात्यक्षिक केंद्र)  द्वारे केली जाते.

 

जिल्हा क्षयरोग केंद्र (DTC):  हे   जिल्हा आरोग्य संस्थेच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व क्षयरोग निर्मूलन उपक्रमांसाठी नोडल पॉइंट आहे.

 

टीबी युनिट  (क्षयरोगपथक)  (TU) स्तर:     ब्लॉक/उप-जिल्हा स्तरावर NTEP कार्यक्रम  TU द्वारे राबविण्यात येतात, ज्यात नियुक्त वैद्यकीय अधिकारी (MO-TU) यांचा समावेश असतो ज्यांना दोन पूर्ण-वेळ NTEP कर्मचारी - STS (वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक) आणि STLS (वरिष्ठ टीबी लॅब पर्यवेक्षक) द्वारे समर्थित ) सहाय्य करतात.

पीएचआय (पेरिफेरल हेल्थ इन्स्टिट्यूट – क्षेत्रीय आरोग्य संस्था PHI ):   पीएचआय ही वैद्यकीय अधिकारी (एमओ) द्वारे चालवलेली आरोग्य संस्था आहे. काही PHI ही क्षयरोग निदान केंद्रे (TDC/ पुर्वी DMC) देखील आहेत, जी NTEP संरचनेतील सर्वात परिधीय (शेवटचे) स्तरावरील प्रयोगशाळा आहेत. खाजगी प्रॅक्टिशनर्स / खाजगी हॉस्पिटल्स / क्लिनिक्स / नर्सिंग होम्स सारख्या सर्व खाजगी आरोग्य संस्था देखील PHI आहेत.

आकृती: NTEP ची संघटनात्मक रचना

Resources:

Content Creator

Reviewer

Comments