Linked Node

Content

टीबी उपचार पद्धतीचे वर्गीकरण

दैनंदिन उपचार पद्धती (Daily Regimen) --क्षयरोगाच्या रूग्णांसाठी दैनंदिन उपचार पद्धती लिहून दिली जातात, जेथे रूग्णांना दररोज औषध घेणे आवश्यक असते.
 
दैनंदिन उपचार पद्धती मध्ये प्रथम  श्रेणीतील क्षयरोगविरोधी औषधांचा समावेश होतो, त्या खालील  बाबीवर  आधारित आहे

  • वय: प्रौढ /बालक 
  • रुग्णाचे वजन: वजन श्रेणी 

वय: वयाच्या आधारावर, रूग्णांचे वर्गीकरण केले जाते

  • प्रौढ: रुग्णाचे वय 19 वर्षे किंवा त्याहून अधिक असावे.
  • बालरोग: रुग्णाचे वय 18 वर्षांपर्यंत आणि वजन 39 किलोपेक्षा कमी

 
वजन श्रेणी ( Weight Band ):

  • उपचाराचा डोस टीबी रुग्णाच्या वजनावर आधारित असतो.
  • प्रौढ आणि बालरोग रूग्णांसाठी वेट बँड श्रेणी स्वतंत्रपणे तयार केलेली आहे आणि त्या वजनाच्या श्रेणीवर आधारित औषधे दिली जातात.

Content Creator

Reviewer